शहर पोलीस दलात बदलीचे वारे

Foto
शनिवारी आयुक्‍तांसमोर होणार मुलाखती
कोरोनामुळे पोलिसांच्या रखडलेल्या बदल्याना आता गती मिळाली आहे. शनिवारी  631 कर्मचार्‍यांना पोलीस आयुक्त कार्यालयाच्या अभ्यागत कक्षात बोलविण्यात आले असून यावेळी पोलीस आयुक्त, कर्मचार्‍यांची विनंती वरून बदली विषयी इच्छित स्थळाबाबत जाऊन घेणार आहे.यामुळे अनेक महिन्यापासून बदलीची वाट पाहणार्‍या कर्मचार्‍यामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
ज्या कर्मचार्‍यांचे एकाच ठिकाणी पाच वर्षे सेवा पूर्ण झाली आहे अशा कर्मचार्‍यांची दरवर्षी मे ते जून  दरम्यान होणार्‍या पोलीस दलातील पोलीस शिपाई ते साह्ययक फौजदार पदावरील कर्मचार्‍यांच्या नियमित बदल्या कोरोनाच्या महामारी मुळे रखडल्या होत्या.मात्र आता या बदल्याना गती मिळाली आहे. ज्या कर्मचार्‍यांना विनंती वरून  बदली हवी आहे असे शिपाई ते साह्ययक फौजदार पदावरील 631 पोलीस कर्मचारर्‍यांना शनिवारी  पोलीस आयुक्त कार्यालय येथे अभ्यागत कक्षात हजर राहण्याबाबत पोलीस उपआयुक्त मीना मकवना यांनी बुधवारी आदेश काढले आहे. यामध्ये  85 साह्ययक फौजदार,91 पोलीस हवलंदार,147 पोलीस नाईक, पोलीस शिपाई 308 अशा प्रकारे 631 पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. शनिवारी सकाळ पासून या मुलाखती सुरू होणार असून सहाय्यक फौजदार 9.30 ते 10.30 , हवालदार 10.30 ते12.00, पोलीस नाईक 12 ते 2.00 आणि पोलीस शिपाई यांना दुपारी 3 वाजेची वेळ देण्यात आली आहे.वेळेवर उपस्थित न राहणार्‍या कर्मचार्‍यांच्या विनंतीचा   विचार करण्यात येणार नाही असे सूत्रांनी सांगितले आहे.बुधवारी निघालेल्या बदलीविषयीच्या मुलाखती बाबत आदेशाने कर्मचार्‍यामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker